आज १५ ऑगस्ट. हिंदुस्थानभर स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. सर्वप्रथम सर्व वाचकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.
मला एक प्रश्न पडलाय आपण खरच स्वतंत्र झालोय कां ?
हा प्रश्न पडायला आजची सामाजीक परिस्थीती कारण आहे. आपण हो आपणच आज बरेच प्रश्न तयार करुन ठेवले आहेत. मी म्हणणार नाही कि या सर्व प्रश्नांना राजकीय नेते जबाबदार आहेत, आपणच त्यांना निवडून दिले आहेना.
आज भ्रष्टाचाराने सारा देश पोखरलाय. कॉमनवेल्थ खेळ याचे ताजे उदाहरण आहे. साधा टॉयलेट पेपर चार हजार रुपयांना ! त्यापेक्षा पॅंटेत कार्यक्रम करुन नविन पॅंट स्वस्तात पडेल !
कुठेही सरकारी कार्यालयात जा पैसे खाऊ घातल्याशिवाय काम होतच नाही. ज्याची पैसे खाऊ घालायची ताकद नाही त्याने काय कराव.
खालील प्रश्नांचा विचार करुन सांगा स्वातंत्र्यदिन का साजरा करावा.
१. शेतकरी अजुनही (शासनाने अनुदान दिल्यावरही) रोज आत्महत्या करतोय. घोषीत अनुदाना पैकी शेतकर्यांना किती पोहोचले ?
२. विद्यार्थी प्रवेशाच्या रांगेत उभा राहुन वैतागला आहे.
३. आदिवासी अजुनही उपासमार सहन करतायत.
४. शिक्षक शिकवण्यापेक्षा निवडणूका, जनगणनेच्या कामात व्यस्त आहेत. मंत्र्यांच्या शाळा कॉलेजात तर शिक्षक बेठबिगारी बरी असेच वागवले जातात. शिक्षण सेवक नावाचा मोठा भ्रष्टाचार जोरात चाललाय. तीन हजारात शिक्षकाने आपले घर कसे चालवाव ?
५. महागाईने सामान्य जनता बेजार आहे.
६. कोणत्याही गावात / शहरात रस्त्यांची स्थिती बघा. चंद्रावर चालणे सोपे वाटावे.
७. राजकारणाने निचतम सीमा गाठलीय. मंत्री राज्यासाठी की राज्य मंत्र्यासाठी असाच प्रश्न पडावा. सर्व राजकिय पक्षांचे साटेलोटे आहे व सामान्य जनता सैरभैर झाली आहे.
८. साथीचे रोग फैलावत आहेत व ज्यांच्या कडून समाजाला काही अपेक्षा आहेत ते डॉक्टर आपले खिसे भरण्यात मग्न आहेत.
९. रस्त्यांची स्थिती खराब असतानाही टोल नाके दिवसेंदिवस वाढतच आहे.
१०. अन्न पदार्थां मधली भेसळ भयानक रुप धारण करित आहे.
वेळ आली आहे सामान्य जनतेने शहाण होऊन एकत्र येऊन असल्या परिस्थीतिशी दोन हात करण्याची.
तर आणि तरच हिंदूस्थान स्वतंत्र झाला असे म्हणता येईल.