आज ठरल्या प्रमाणे माय नेम इज..... प्रदर्शित करायचा प्रयत्न झाला. सिनेमा बघणार्यांच्या यादित राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आपल्या सार्या फौजफाट्या सिनेमा बघायला गेल्याचे संध्याकाळच्या बातम्यात कळले. माझा आनंद गगनात मावेना.
या बातम्यांप्रमाणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना व गृहमंत्र्यांना आपल्या फौजफाट्यासह सिनेमा बघायला वेळ मिळाला याचा अर्थ त्यांना इतर कोणतेही काम राहिले नसावे, याचाच दूसरा अर्थ राज्याचे सर्व प्रश्न सुटले असावेत.
राज्यातील जनता आता अत्यंत आनंदाने वावरताना दिसेल असे मानायला हरकत नसावी. शेतकर्यांनी आता आत्महत्या करु नये. दहावीच्या विद्यार्थ्यांनी अकरावीचा प्रवेश कसा मिळेल याची काळजी करु नये. लोकांनी महागाई वाढल्याचे तुणतुणे वाजवू नये. मुंबईतील गर्दी वाढत चालल्याचे जुनेच रडगाणे मुंबई करांनी गाऊ नये.
कारण, आता माय नेम इज ...... ठरल्या प्रमाणे प्रदर्शित झाला आहे हो..... !!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा