कालपासुन मुंबईत लोकलचे मोटरमन संपावर गेले. मोटरमनला या आंदोलनासाठी दोष देणे योग्य होणार नाही. त्यांच्या योग्य मागण्यांसाठी प्रशासनाला भरपुर वेळ दिला असतानाही प्रशासनाने या मागण्यांकडे लक्ष दिले नाही त्याचा परिणाम आपण काल पासुन अनुभवतो आहेच.
कोणत्याही मागण्याकडे वेळीच लक्ष न देणे हे नालायक राजकारण्यांना चांगले जमते. याचा परिणाम समाजात वाढत चाललेल अराजकाच्या रुपाने आपण सर्व चांगल्या प्रकारे जाणतो.
काल प्राध्यापक संपावर गेले होते, आज मोटरमन संपावर गेलेत उद्या शासकीय तंत्रनिकेतन अधिव्याख्यात्यांसोबत आणखी कोणी संपावर गेलेत तर दोष त्या कर्मचार्यांना कसा देणार ?
शासन व प्रशासनाने या प्रकारच्या मागण्यांकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा