स्वा. सावरकर सागरी सेतू .

कॉंग्रेसच्या लाचार शासनाने वरळी वांद्रे सागरी सेतूला मुंबईशी काहिही देणे - घेणे नसलेल्या राजीव गांधीचे नाव दिले.
सर्व मराठी बांधवांनी या सागरी सेतूला न चुकता स्वा. सावरकर सागरी सेतूच म्हणावे.

पुरा देश गांधी - नेहरु के नाम.

भारतात फक्त गांधी व नेहरु घराण्यांनीच काय तो त्याग केला आहे ? त्यामुळे फक्त त्यांच्याच नावाने योजना असतात. भारत सरकारच्या जवळ जवळ ४५० योजनांना गांधी - नेहरु घराण्यातल्या लोकांचीच नावे आहेत.
या योजनांची नावे वाचा-
http://www.hindujagruti.org/news/7449.html

व म्हणा-

जय हो !

मंगळवार, ३० डिसेंबर, २००८

अंबड पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यास लाच घेताना अटक.

http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=NashikEdition-6-1-30-12-2008-76c01&ndate=2008-12-30&editionname=nashik
आजच्या लोकमतला आलेली ही बातमी.
पोलीस ठाण्याच्याच कर्मचार्‍याने लाच घेतली तर सामान्य जनता कोणाकडे पहाणार ?
सरकारने पोलीसांवरचा भार व त्यांचे पगार तपासावेत तसेच पगार व त्यांनी जमवलेली मालमत्ताही तपासुन पहावी.
मंत्र्यांना जनता प्रामाणिक रहावी असे वाटत असेल तर अगोदर त्यांनी तसा आदर्श निर्माण करावा अन्यथा जनता एखादा अप्रिय निर्णय घेऊ शकते ज्यामूळे यादवी माजेल.

सोमवार, २९ डिसेंबर, २००८

बनावट नोटांच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा.

वाचा http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3906294.cms
याचे काय करायचे ?
खटले चालतील व काही वर्षांनी लोक विसरतील.
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील हडको कॉलनीतील बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना पोलिसांनी शनिवारी उघडकीस आणला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, बनावट नोटा, दोन कम्प्युटर, नोटा तयार करण्याचे साहित्य असा एकंदर ५० हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. पुसेगाव येथील यात्रेत बनावट नोटा खपवण्यात येणार असल्याची खबर कळताच, फलटण पोलिस व गुन्हे प्रकटीकरण पथक बारामती व दरोडाविरोधी प्रतिबंधकचे अधिकारी मोहिमेवर रवाना झाले. फलटण-सातारा मार्गावर मोटारसायकलवरून येणारा नेताजी माणिकराव निंबाळकर (२५) याची झडती घेतली असता, त्याच्याकडे १०० रुपयांच्या ६४ बनावट नोटा आढळून आल्या. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हडको कॉलनीतील एका घरावर छापा घालून निंबाळकरचा साथीदार व बनावट नोटा तयार करणारा अजिंक्य बाळकृष्ण कदम (१७) याला ताब्यात घेतले. अजिंक्यने १२वीसाठी फॉर्म भरला असून, हार्डवेअर नेटवकिर्ंगचा कोर्सही केला आहे. तर निंबाळकरने कराड येथे जाऊन बनावट नोटा कशा तयार करतात, याची माहिती करून घेतली होती. केवळ शंभरच्याच नोटा त्यांना तयार करता येत असत आणि रात्रीच्या वेळीच ते चलनात आणत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

रविवार, २८ डिसेंबर, २००८

मेरी रिक्षा सबसे निराली.

भ्रष्टाचाराच्या या युगात एक अशी वार्‍याची मंद झुळूक सुखद वातावरण तयार करते.
गरिब रिक्षावाला अनेकांचे जीवन उजळू शकतो व भ्रष्ट कर्मचार्‍यांना चांगला धडा शिकवू शकतो.
संपुर्ण बातमी चाचण्यासाठी टिचकी द्या.



आभार मानण्यासाठी दशरथ सुक्रे यांना संपर्क करा - 9224476288 .

भ्रष्टाचारा विरुद्ध आपण लढायला तयार होणार का ?

Related Posts with Thumbnails