तस मला भेटणार्या प्रत्येकाकडुन काहिना काही शिकायला आवडते, अट एकच आहे, ज्याच्या कडून शिकायच आहे तो त्या कलेत माहीर असायला हवा.
आज मला "लाचारी" ही कला शिकायला मिळाली. माझा या कलेतला गुरुपण या कलेत माहीर होता.
आज संध्याकाळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप होता व त्याला आपले मुख्यमंत्री महोदय येतील अशी माझी अपेक्षा होती कारण ते सन्माननीय पाहूणे म्हणून अपेक्षीत होते. तसेच या कार्यक्रमाला महानायक अमिताभ बच्चन पण येणार होते.
अमिताभ बच्चन कार्यक्रमाला असतांना मुख्यमंत्री तेथे गेले असते तर त्यांना कदाचित "मॅडमच्या" नाराजीचा सामना करावा लागला असता. त्यामूळे समस्त मराठी जनांना डावलून त्यांनी कार्यक्रमाला दांडी मारणे पसंत केले.
मराठी साहित्यीकांच्या दिवाळीला मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण असल्यामुळे उपस्थीत असाव हा संकेत त्यांनी ज्या लाचारपणे मोडला ह्या पेक्षा अधिक लाचारी कुठेच बघायला मिळाली नाही व कदाचीत मिळणार पण नाही.
पण मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहून व स्व्त:च एकही वाक्य मराठीत न उच्चारता श्री. अमिताभ बच्चन यांनी मात्र सर्व मराठी जनांना मात्र सहजच जिंकल हेही येथे नमूद करावस वाटत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा