आज भारत सरकारने पद्मश्री व पद्मविभूषण हे किताब जाहिर केले. यादी बघुन फार आनंद झाला कारण या यादीत ऎश्वर्या राय बच्चन व हेलन खान यांची नावे आहेत. या सोबतच डॉ. अनिल काकोडकर यांना पद्मविभुषण जाहिर झाले आहे.
काय आहे या ऎश्वर्या राय व हेलन खानचे कर्तुत्व ? पडद्यावर नाचले म्हणजे जर असा सन्मान मिळत असेल तर गावो गावी आजची मुले जे चाळे करत आहेत त्यांना का पोलीस पकडतात ?
डॉ. काकोडकरांसारखी नावे सन्मानाच्या यादीत बघितली तर अभिमान वाटतो पण या सोबत ऎश्वर्या राय !
पडद्यावर नाचून पैसे कमवायचे व वाट्टेलते चाळे करायचे व किताब मिळवायचा, वारे देशा तुझी सरकार.
या पेक्षा मला कोणत्याही प्राथमिक शाळेतला शिक्षक चांगला वाटतो. त्याला का नाही असा सन्मान मिळत ? त्याचे कर्तुत्व या नाचणार्याहून नक्किच मोठे असते.
मला आजही माझ्या प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांची आठवण येते कारण मला घडवण्यात त्यांचा वाटा आहेच व मला अशा खरेदी केलेल्या किताबापेक्षा मोठ्ठ्या किताबाचे मानकरी वाटतात.
जय भारत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा