स्वा. सावरकर सागरी सेतू .
कॉंग्रेसच्या लाचार शासनाने वरळी वांद्रे सागरी सेतूला मुंबईशी काहिही देणे - घेणे नसलेल्या राजीव गांधीचे नाव दिले.
सर्व मराठी बांधवांनी या सागरी सेतूला न चुकता स्वा. सावरकर सागरी सेतूच म्हणावे.
पुरा देश गांधी - नेहरु के नाम.
भारतात फक्त गांधी व नेहरु घराण्यांनीच काय तो त्याग केला आहे ? त्यामुळे फक्त त्यांच्याच नावाने योजना असतात. भारत सरकारच्या जवळ जवळ ४५० योजनांना गांधी - नेहरु घराण्यातल्या लोकांचीच नावे आहेत.
या योजनांची नावे वाचा-
http://www.hindujagruti.org/news/7449.htmlव म्हणा-
जय हो !
पिंपरी - चिंचवड मध्ये गंभीर गुन्हे असलेले ३८ नगरसेवक आहेत.
आपले नगरसेवक निवडताना पिंपरी - चिंचवडचे लोक काय झोपले होते कां ? कि या नगरसेवकांनी त्यांना विकत घेतल होतं ?
या गुन्हेगार नगरसेवकां कडून समाजाने काय अपेक्षा कराव्यात ?
या नगरसेवकांनी सामाजीक गुन्ह्यांसोबतच नक्किच आर्थीक गुन्हेही केलेच असणार व यासाठी आम्हीच जबाबदार आहोत. यापुढे होणार्या निवडणुकांत असे उमेदवार निवडून येणार नाहीत याची आम्ही सर्वांनीच काळजी घ्यायला हवी. हे उमेदवार कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना निवडून देऊन आम्हाला गुन्हेगार व्हायचे नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा