स्वा. सावरकर सागरी सेतू .

कॉंग्रेसच्या लाचार शासनाने वरळी वांद्रे सागरी सेतूला मुंबईशी काहिही देणे - घेणे नसलेल्या राजीव गांधीचे नाव दिले.
सर्व मराठी बांधवांनी या सागरी सेतूला न चुकता स्वा. सावरकर सागरी सेतूच म्हणावे.

पुरा देश गांधी - नेहरु के नाम.

भारतात फक्त गांधी व नेहरु घराण्यांनीच काय तो त्याग केला आहे ? त्यामुळे फक्त त्यांच्याच नावाने योजना असतात. भारत सरकारच्या जवळ जवळ ४५० योजनांना गांधी - नेहरु घराण्यातल्या लोकांचीच नावे आहेत.
या योजनांची नावे वाचा-
http://www.hindujagruti.org/news/7449.html

व म्हणा-

जय हो !

रविवार, १५ ऑगस्ट, २०१०

स्वातंत्र्य ???

आज १५ ऑगस्ट. हिंदुस्थानभर स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय.  सर्वप्रथम सर्व वाचकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.

मला एक प्रश्न पडलाय आपण खरच स्वतंत्र झालोय कां ?

हा प्रश्न पडायला आजची सामाजीक परिस्थीती कारण आहे. आपण हो आपणच आज बरेच प्रश्न तयार करुन ठेवले आहेत. मी म्हणणार नाही कि या सर्व प्रश्नांना राजकीय नेते जबाबदार आहेत, आपणच त्यांना निवडून दिले आहेना.

आज भ्रष्टाचाराने सारा देश पोखरलाय. कॉमनवेल्थ खेळ याचे ताजे उदाहरण आहे. साधा टॉयलेट पेपर चार हजार रुपयांना ! त्यापेक्षा पॅंटेत कार्यक्रम करुन नविन पॅंट स्वस्तात पडेल !

कुठेही सरकारी कार्यालयात जा पैसे खाऊ घातल्याशिवाय काम होतच नाही. ज्याची पैसे खाऊ घालायची ताकद नाही त्याने काय कराव.

खालील प्रश्नांचा विचार करुन सांगा स्वातंत्र्यदिन का साजरा करावा.
१. शेतकरी अजुनही (शासनाने अनुदान दिल्यावरही) रोज आत्महत्या करतोय. घोषीत अनुदाना पैकी शेतकर्‍यांना किती पोहोचले ?
२. विद्यार्थी प्रवेशाच्या रांगेत उभा राहुन वैतागला आहे.
३. आदिवासी अजुनही उपासमार सहन करतायत.
४. शिक्षक शिकवण्यापेक्षा निवडणूका, जनगणनेच्या कामात व्यस्त आहेत. मंत्र्यांच्या शाळा कॉलेजात तर शिक्षक बेठबिगारी बरी असेच वागवले जातात. शिक्षण सेवक नावाचा मोठा भ्रष्टाचार जोरात चाललाय. तीन हजारात शिक्षकाने आपले घर कसे चालवाव ?
५. महागाईने सामान्य जनता बेजार आहे.
६. कोणत्याही गावात / शहरात रस्त्यांची स्थिती बघा. चंद्रावर चालणे सोपे वाटावे.
७. राजकारणाने निचतम सीमा गाठलीय. मंत्री राज्यासाठी की राज्य मंत्र्यासाठी असाच प्रश्न पडावा. सर्व राजकिय पक्षांचे साटेलोटे आहे व सामान्य जनता सैरभैर झाली आहे.
८. साथीचे रोग फैलावत आहेत व ज्यांच्या कडून समाजाला काही अपेक्षा आहेत ते डॉक्टर आपले खिसे भरण्यात मग्न आहेत.
९. रस्त्यांची स्थिती खराब असतानाही टोल नाके दिवसेंदिवस वाढतच आहे.
१०. अन्न पदार्थां मधली भेसळ भयानक रुप धारण करित आहे.

वेळ आली आहे सामान्य जनतेने शहाण होऊन एकत्र येऊन असल्या परिस्थीतिशी दोन हात करण्याची.

तर आणि तरच हिंदूस्थान स्वतंत्र झाला असे म्हणता येईल.

गुरुवार, ८ जुलै, २०१०

महाराष्ट्राची प्रगती !

          सर्वांना माहितच आहे महाराष्ट्रात आघाडी सत्तेवर आहे. हो आघाडी म्हणजेच कॉंग्रेस व (अ)राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी. सत्ता  आघाडीची असली तरी सर्व "मलईदार" खाते (अ)राष्ट्रवादी कडे आहेत ही कॉंग्रेसची पोटदूखी.
          महाराष्ट्राची या आघाडीमुळे फारच प्रगति होत आहे असे आघाडीतल्या घटक पक्षांचे म्हणणे आहे, जे आम्हाला १०० % मान्य आहे. आघाडिच कामच तसे चाललय तर आम्हाला मान्यच कराव लागणार ना ! आमचाही नाईलाज आहे !
           या आघाडीने बरेच प्रश्न सहजच सोडवलेत आणि आम्हाला याचे खरच फार्फार कौतुक वाटते. उदाहरणार्थ काही प्रश्न कसे सोडवलेत ते बघुया.
१. शेतकर्‍यांच्या आत्महत्या कमी झाल्यात कारण आपण आत्महत्या केल्यावर आपल्या परिवाराची फरफट फारच वाढते हे त्या शेतकर्‍यांना कळले. अन्यथा मदत मिळवण्यासाठी या आत्महत्या वाढल्या असत्या.
२.   पूर्णवेळ शिक्षणमंत्री नेमला असता तर कदाचीत दहावीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न कैक पटिने वाढला असता, त्यामुळे शिक्षण मंत्री नेमलाच नाही. हे सरकार एवढे समर्थ असताना नागरिकांनी शिकायची काय गरज आहे ? त्याच प्रमाणे उच्च  व तंत्रशिक्षण मंत्री आपले खाते यशस्वीपणे सांभाळतायत. सहावा वेतन आयोग दिल्यास अभियांत्रिकी शिक्षक वर्गात समाधानकारक शिकवतील विद्यार्थी उत्तिर्ण झाल्यावर अभियंते मोठ्ठ्या प्रमाणात वाढतील व समाजात बेकार अभियंते वाढतील त्यापेक्षा त्यांना वेतन आयोग न दिल्यास नाराजीने शिकवणे थांबेल बेकार अभियंते कमी रहातील व नागरिक सामान्यच रहातील.
३.  महाराष्ट्रात धर्मांध म्लेच्छांकडून बर्‍याच दंगली घडवण्यात आल्या. याचा ईतिहास सर्वांनाच चांगला माहित आहे. या दंगलींना हिंदूंकडून विरोध व्हायचा, हिंदूच जर विरोध करण्यास असमर्थ ठरले तर ? विरोध न झाल्यामुळे दंगली कमी झाल्या व म्लेच्छ कसेही वागायला मोकळे झालेत व दंगली कमी झाल्या.
    आता काय आपले पॉवर साहेब तर ICC चे अध्यक्ष झाले. साहेब महाराष्ट्राचे असल्याने महाराष्ट्र नं १ झालाच ना ?
तर रडू नका परत फूडच्या निवडणुकीत याईलेच निवडून आना वा आपले प्रस्न विसरुन जा साहेबांनो.

बुधवार, १६ जून, २०१०

मराठी.

मराठीचा मुद्दा हा रजकीय असुच शकत नाही. कोणताही राजकीय पक्ष हा मुद्दा पळवू शकत नाही. मराठी माणसे दाक्षिण्यात्यांसारखे कायम राजकारणाचा विचार करित नाही पण आपसात वागतांना मात्र एखाद्या राजकारण्यासारखे वागतात. हेच कारण आहे आज प्रत्येक जण उठतो व मराठी मराठी करित सुटतो.
मी गेली बरिच वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी मराठी या मुद्यावर लिहीत आलो आहे. पण काही मराठी ब्लॉग्स वर मराठी या विषयावर वाचल्यावर माझ्या डोक्यात ही पोस्ट लिहायचा विचार आला. या लेखाचा उद्देश कोणालाही कमी लेखण्याचा किंवा डिवचण्याचा नाही.
मी भारतात बर्‍याच राज्यांमधे फिरलेलो आहे. फिरतांना माझी काही निरिक्षणे खालील प्रमाणे आहेत मराठी वाचकांनी प्रामाणीक पणे यांचा विचार करुन यापुढे निदान महाराष्ट्रात तरी केवळ मराठीतच संवाद साधावा.
इतर राज्यातील निरिक्षणे :
१. सर्व राज्यात तेथील लोकांना त्यांच्या भाषेचा अभिमान असतो व ते वागताना तसे दाखवतात.
२. तेथील बहुतेक व्यवहार स्थानीक भाषेतच केले जातात.
३. त्यांचे स्थानीक दोन माणसे भेटलीत तरिही ते आपल्या उपस्थितीत सुद्धा त्यांच्या भाषेतच बोलतात.
४. सर्वच परराज्यातील माणसे आपल्या भाषेच्या माणसांना कोणत्याही बाबतीत अग्रक्रम देतात.

मी गेली काही दिवस मुंबईतील  FM चॅनेल्सवर लक्ष ठेवून आहे. बहुतेक चॅनल्सवर मराठी गाणी वाजवण्यात येत नाहीत किंवा त्यांच्या वेळा मराठी माणसांना सोयीच्या नाहीत. यावर उपाय मी माझ्या साठी शोधला आहे व या सर्व चॅनल्सच्या प्रमुखांना मी मराठीतुनच ई-मेल्स पाठवायचा निर्णय घेतला आहे. रोज एक ई-मेल प्रत्येकाला पाठवणार बघुया किती दिवसांत फरक पडतो. न पडल्यास सर्व मराठी लोकांनी अशा चॅनल्सना वठणीवर आणायला तयार असावे.
महाराष्ट्राततरी या सर्व चॅनल्सवर बहुतेक वेळा फक्त मराठी गाणीच वाजवावीत अशिही मागणी मी या पत्रांत करणार आहे.

        आजच पत्र रेडिओ मिर्चीच्या प्रमुखांना  श्री. श्रीराम किलंबी यांना त्यांच्या sriram.kilambi@timesgroup.com या ई-मेल पत्यावर पाठवीत आहे. श्री. किलंबी हे मुंबई स्टेशनचे प्रमुख आहेत.


मा. श्री. किलंबी साहेब.
        मी आपल्या रेडिओ मिर्चीचा एक श्रोता असुन माझ्या पहाण्यात असे आले आहे की आपल्या रेडिओ स्टेशनवर, रेडिओ स्टेशन मुंबईत असुनही मराठी गाण्यांवर अन्याय होत आहे.
        आपण या ई-मेलची दखल घेवून त्वरीत व कमीतकमी दिवसाचे बारा तास मराठी गाणे वाजवावेत हि विनंती.
         आपण या विनंतीचा मान राखाल ही अपेक्षा.

 दिनेश.

ता. क. आपल्याला लिहीलेल्या ई-मेलला मी माझ्या ब्लॉगवर सुद्धा प्रसिद्धी देत आहे याची नोंद घ्यावी. आपल्या कडून उत्तर आल्यास त्याला सुद्धा याच ब्लॉगवर प्रसिद्धी दिली जाईल.



मंगळवार, ४ मे, २०१०

नालायक शासन : निर्लज्ज प्रशासन : हतबल जनता : बेठबिगार कर्मचारी.

                   कालपासुन मुंबईत लोकलचे मोटरमन संपावर गेले. मोटरमनला या आंदोलनासाठी दोष देणे योग्य होणार नाही. त्यांच्या योग्य मागण्यांसाठी प्रशासनाला भरपुर वेळ दिला असतानाही प्रशासनाने या मागण्यांकडे लक्ष दिले नाही त्याचा परिणाम आपण काल पासुन अनुभवतो आहेच.
                   कोणत्याही मागण्याकडे वेळीच लक्ष न देणे हे नालायक राजकारण्यांना चांगले जमते. याचा परिणाम समाजात वाढत चाललेल अराजकाच्या रुपाने आपण सर्व चांगल्या प्रकारे जाणतो.
                   काल प्राध्यापक संपावर गेले होते, आज मोटरमन संपावर गेलेत उद्या शासकीय तंत्रनिकेतन अधिव्याख्यात्यांसोबत आणखी कोणी संपावर गेलेत तर दोष त्या कर्मचार्‍यांना कसा देणार ?
                   शासन व प्रशासनाने या प्रकारच्या मागण्यांकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.

सोमवार, २९ मार्च, २०१०

लाचारिचा धडा.

       तस मला भेटणार्‍या प्रत्येकाकडुन काहिना काही शिकायला आवडते, अट एकच आहे, ज्याच्या कडून शिकायच आहे तो त्या कलेत माहीर असायला हवा.
       आज मला "लाचारी" ही कला शिकायला मिळाली.  माझा या कलेतला गुरुपण या कलेत माहीर होता.
        आज संध्याकाळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप होता व त्याला आपले मुख्यमंत्री महोदय येतील अशी माझी अपेक्षा होती कारण ते सन्माननीय पाहूणे म्हणून अपेक्षीत होते. तसेच या कार्यक्रमाला महानायक अमिताभ बच्चन पण येणार होते.
        अमिताभ बच्चन कार्यक्रमाला असतांना मुख्यमंत्री तेथे गेले असते तर त्यांना कदाचित "मॅडमच्या" नाराजीचा सामना करावा लागला असता. त्यामूळे समस्त मराठी जनांना डावलून त्यांनी कार्यक्रमाला दांडी मारणे पसंत केले.
          मराठी साहित्यीकांच्या दिवाळीला मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण असल्यामुळे उपस्थीत असाव हा संकेत त्यांनी ज्या लाचारपणे मोडला ह्या पेक्षा अधिक लाचारी कुठेच बघायला मिळाली नाही व कदाचीत मिळणार पण नाही.
        पण मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहून व स्व्त:च एकही वाक्य मराठीत न उच्चारता श्री. अमिताभ बच्चन यांनी मात्र सर्व मराठी जनांना मात्र सहजच जिंकल हेही येथे नमूद करावस वाटत.

शुक्रवार, २६ मार्च, २०१०

राष्ट्रवादी ???

          संभाजीनगर महापालीकेच्या निवडणूका लौकरच होणार आहेत सर्वच पक्ष आपापले उमेदवार रिंगणात उतरवताहेत.
           या निवडणुकीत स्वत:ला निधर्मी म्हणवणारे दोन पक्ष सर्वांना माहीतच आहेत. निधर्मी म्हणजे कोणताही धर्म (माणुसकिचाही) न मानणारे अशी माझी स्वत:ची व्याख्या आहे.
         या निवडणूकीत स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवणार्‍या (व राष्ट्रा बद्दलचे कर्तव्य न जाणणार्‍या) पक्षाने आपला एक कदिर मौलाना नावाचा उमेदवार उभा केला आहे. सोबत त्या उमेदवाराने आपले पत्रक कसे छापले आहे त्याची एक झलक आपल्यासाठी देत आहे.
          ही झलक वाचल्यावर आपल्याला काय वाटते हे कृपया टिप्पणीत कळवणे.

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१०

सर्व प्रश्न सुटलेत काय ...... ?

              आज ठरल्या प्रमाणे माय नेम इज..... प्रदर्शित करायचा प्रयत्न झाला. सिनेमा बघणार्‍यांच्या यादित राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री  आपल्या सार्‍या फौजफाट्या सिनेमा बघायला गेल्याचे संध्याकाळच्या बातम्यात कळले. माझा आनंद गगनात मावेना.
              या बातम्यांप्रमाणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना व गृहमंत्र्यांना आपल्या फौजफाट्यासह सिनेमा बघायला वेळ मिळाला याचा अर्थ त्यांना इतर कोणतेही काम राहिले नसावे, याचाच दूसरा अर्थ राज्याचे सर्व प्रश्न सुटले असावेत.
                राज्यातील जनता आता अत्यंत आनंदाने वावरताना दिसेल असे मानायला हरकत नसावी. शेतकर्‍यांनी आता आत्महत्या करु नये. दहावीच्या विद्यार्थ्यांनी अकरावीचा प्रवेश कसा मिळेल याची काळजी करु नये. लोकांनी महागाई वाढल्याचे तुणतुणे वाजवू नये. मुंबईतील गर्दी वाढत चालल्याचे जुनेच रडगाणे मुंबई करांनी गाऊ नये.
                कारण, आता माय नेम इज ...... ठरल्या प्रमाणे प्रदर्शित झाला आहे हो..... !!!

बुधवार, ३ फेब्रुवारी, २०१०

राज्याच्या मंत्र्यांकडे लाखो रुपयांची पाणीपट्टी थकीत.

आजच्या सर्वच वर्तमान पत्रांनी मुखपृष्ठावर "राज्यातील मंत्र्यांकडे" थकीत असलेल्या पाणीपट्टी बद्दलची बातमी छापली आहे.
अशा या मंत्र्यांनी जनतेला यातुन एक संदेश दिलेला आहे. आपल्या कडे कोणतीही थकबाकी असल्यास ती द्यायची गरज नाही. कोणी मागायला आल्यास या मंत्र्यांकडे बोट दाखवा व त्यांच्याच सांगण्याप्रमाणे आपण ही थकबाकी देत नसल्याचे सांगा.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेच यातील ५ लाख २९ हजार एवढी थकबाकी आहे. त्यांच्या मंत्रालयात विचारणा केली असता असे कळले की साहेब फार व्यस्त आहेत. मला वाटते ही थकबाकी भरायला साहेबांना रांगेत उभे रहावे लागते कि काय ? आम्हा सामान्य माणसां सारखे !

रविवार, २४ जानेवारी, २०१०

जय हो !



भारत सरकारच्या एका मंत्रालयाने दिलेली सोबतची जाहिरात बघा.

महिला व बाल विकास मंत्रालयाने दिलेली ही जाहिरात वादग्रस्त झाली आहे कारण यात पाकिस्तानचे पूर्व हवाईदल प्रमुख तन्वीर महमूद अहमद याचा फोटो पण दिलेला आहे. हिरव्यांचा कायम लांगूलचालन करणारे आपले सरकार किती लाचार असु शकते याचा हा आणखी एक पुरावा समजावा कि / वा भारतातले आदर्श संपल्याने आता आदर्शही आयात करावे लागलेयत ?
भारतीय सैन्यदलात असा कोणी सापडला नाही काय व आयात करावासा वाटला तोही थेट पाकिस्तानातुन !

शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २००९

कॉंग्रेसच्या लाचारपणाचा पुरावा.

मराठी दैनिक सामनात आलेली ही बातमी वाचा व कॉंग्रेस मतांसाठी कोणत्या थराला जाऊ शकते व किती लाचार होऊ शकते यासाठीचा पुरावा दुसरा कोणता असु शकतो ?
अफजलखानाची कबर ही पवित्र वास्तु.
http://www.saamna.com/2009/Nov/19/Index.htm

शनिवार, १० ऑक्टोबर, २००९

तुम्हाला काय वाटतय ?

आज असाच रिकामा बसुन होतो म्हटले चला बघूया हिंदी ब्लॉग विश्वात काय चाललय. तर खालील ब्लॉग सहजच हाती लागला. वाचल्यावर विश्वासच बसेना कि असेही काही असु शकते. माझतर डोकच चालेना, म्हटल चला आपल्या वाचकांना विचारुन बघूया त्यांना काय वाटतय. तर हा हिंदी ब्लॉग वाचल्यावर सांगा तुम्हाला काय वाटतय.
आपल्याला हिंदी कळत नसेल तर याच भाषांतर मी लगेच पोस्ट करायच्या विचारात आहे थोडी वाट बघायला लागेल इतकच.
हिंदी ब्लॉगची लिंक : http://mahashaktigroup.bharatuday.in/2009/10/blog-post_08.html



आज की कांग्रेस इतनी गिर चुकी है

अभी पिछले दिनों आँध्रप्रदेश के मुख्यमंत्री y s रेड्डी की मौत विमान दुर्घटना में हो गई.सभी चेनल्स में कहा गया की उनकी मौत के दुख में 462 लोगो ने आत्महत्या कर ली""आश्चर्य होता है न आज के समय में किसी नेता के लिए इतना प्यार देखकर!!! लेकिन बाद में मालूम पड़ा की ये प्यार नेता के लिए नहीं बल्कि पैसे के लिए था मतलब की कांग्रेस सरकार ने देश को जितने भी लोगो को खुदख़ुशी करने वालों में गिनाया था वो सभी खुदखुशी के कारण नहीं बल्कि अपनी स्वाभाविक मौत मरे थे"जी हां एक सनसनीखेज़ खुलासे में ये बात सामने आई है की मरने वाले लोगो के घर वालो को सरकार ने 5000-5000 Rs. दिए थे और बदले में उनलोगों को ये बोलना था की "मरने वाला आदमी अपनी स्वाभाविक मौत नहीं मरा बल्कि उसने मुख्यमंत्री के गम में आत्महत्या की है."शर्म आती है ये बाते सुन-सुन कर की आज की कांग्रेस इतनी गिर चुकी है की लोगो की मौत पर भी राजनीति करने लगीकाश ये पैसा उन लोगो को मरने से पहले दिया जाता तो शायद वो जी जाते और सच्चे मन से श्रधांजलि देते…अगर आप मानते है कि ये बात देश में सभी को मालुम होनी चाहिए तो इसे अपने सभी दोस्तों तक पहुचाहिये"

शनिवार, ५ सप्टेंबर, २००९

शिक्षक दीन.

काय मथळा पाहून माझी चुक काढता ? अहो सत्य परिस्थीतीच तर मांडतोय.आज शिक्षक दीनच तर झालाय.
शिक्षकाने काही करतो म्हटले कि त्याला आठवते, अरे तो तर समाज घडवणारा प्राणी आहे त्याने भ्रष्टाचारापासुन चार हात लांब राहिले पाहिजे. त्याने शिकवण्या घेऊ नये ते समाजाला घातक आहे. शासनाने तर शिक्षकाच्या बायकोनेही शिकवण्या घेऊ नये व काय काय करु नये असा मध्यंतरी फतवा काढला होता.
असा हा समाजातला एक प्राणी. आज त्याचा पोळा, म्हणजे शिक्षक दिन. समस्त शिक्षक वर्गाला व मला घडवणार्‍या शिक्षकांना माझा नमस्कार.
अशा शिक्षकांना शिक्षक सेवक बनवुन बेठबिगारी करायला लावणार्‍या शासनाला तर माझा कोपर्‍यापासुन नमस्कार.
शिक्षक सेवक ही शासनाने नियमांना बगल देवून तयार केलेली नविन बेठबिगारी आहे, हे शासन अशा शिक्षकां कडून समाज घडवण्याची अपेक्षा कशी करते ? शाळेतील मुलांना मधल्या वेळात सकस अन्न पुरवण्याची योजनाही याच शिक्षकांच्या माथी मारण्यात येते. बिच्चारे शिक्षक.
शिक्षक सेवकाल तीन वर्षाने नियमीत करण्यात येते या दरम्यान होणार्‍या अर्थपुर्ण वाटाघाटी शासनाने विचारात घेतल्यात कां ?
विद्यापीठातील शिक्षकांना त्यांच्या मागण्यासाठी एक महिन्यापेक्षा जास्त काळ आपला संप चालवावा लागतो.
निवडणूका आल्याकी शिक्षकांना कामास लावणार.
तंत्रनिकेतनातल्या शिक्षकांना त्यांच्या थकबाकी साठी दोन वर्षापेक्षा जास्त काळ वाट बघावी लागते.
सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी शिक्षकांसाठी सर्वात शेवटी होते.
५ सप्टेंबर आला की आम्ही शिक्षक दिन साजरा करणार !
जय हो !!!

शनिवार, २२ ऑगस्ट, २००९

हरे राम !

गणेश चतुर्थीला हे काय हे रा म म्हणायच ? नाही हे राम या शासकिय अधिकार्‍यांच्या नावाने आहे.
थोड्या वेळापुर्वीच बातमी आली कि पनवेलला लागलेल्या बस आग प्रकरणाने एका विद्यार्थ्याचा बळी घेतला आहे.
या प्रकरणात बस चालक, मालक, मुलांचे पालक जितके दोषी आहेत तितकेच वाहतुक पोलीस व त्यांचे अधिकारी पण जबाबदार आहेत. वाहतुक पोलीस फक्त हप्ता खाण्यासाठीच नेमले आहेत काय असा प्रश्न पडावा इतकी अंधाधूंदी या विभागात आहे.
शासनाने म्हणजेच शासनाच्याच शिक्षण विभागाने शिक्षणाचे वाटॊळे केल्याचे आपल्या अनुभवाला आलेच असेल अन्यथा विद्यापीठ प्राध्यापकांचा आजही ४३ व्या दिवशी संपुष्टात न आलेला संप कधिच मिटला असता.
याच ब्लॉगवर तंत्रशिक्षण संचालकांनी मान्य केलेल्या पदोन्नतीचा लाभ संबंधित अधिव्याख्यातांना सुमारे वर्षभराने झाल्याचा उल्लेख मागे केला होता. त्यांची थकबाकी शासनाने आजही अडीच वर्षे उलटल्यावरही दिली नसल्याचे कळते.
पनवेल बस जळीत प्रकरणाशीच संबंधित अशिच एक घटना जोगेश्वरीत मागल्या वर्षी घडली होती, त्या संदर्भात लोकसत्तेत आलेली आजची बातमी वाचा.
गेल्या वर्षी जोगेश्वरी येथे ओम्नी व्हॅनला लागलेल्या आगीत काही विद्यार्थी होरपळल्याची दुर्घटना घडल्यानंतर राज्य सरकारने स्कूल बसच्या बाबतीत नियमावली करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. परंतु, एक वर्ष झाल्यानंतरही या समितीला आपला अंतिम अहवाल तयार करण्यात अपयश आले आहे. अंतिम अहवालासाठी आवश्यक असलेली मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने दिरंगाई केल्याने हा अहवाल तयारच झाला नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे समितीने स्कूल बस कशी असावी याबाबतची तात्पुरती (कामचलाऊ) मार्गदर्शक तत्त्वे यापूर्वीच तयार केली आहेत.परिवहन आयुक्त या समितीचे अध्यक्ष आहेत. इतर सदस्यांमध्ये शिक्षण सहसचिव, शिक्षण संचालक, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, जॉन कॅथड्रल स्कूलचे मुख्याध्यापक आणि सामाजिक कार्यकर्त्यां इंद्रायणी मालकाणी यांचा समावेश आहे. समितीच्या आतापर्यंत पाच बैठका झाल्या आहेत. समितीने स्कूल बसबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची जबाबदारी शिक्षण विभागाकडे सोपविण्यात आली होती. मात्र, शिक्षण विभागाने त्याकडे डोळेझाक केल्याचे उघडकीस आले आहे.
यासारख्या इतर बातम्या.

मंगळवार, १६ जून, २००९

शाब्बास नाशिकर.

नाशिककरांच्या या कृतीला राजकारण्यांच्या गुंडगिरीला सामान्य जनतेने देलेले उत्तर असेच म्हणावे लागेल. निवडणूका आल्यावरच अंगात विनम्रता शिरते व निवडून आल्यावर सामान्य जनांना गुंडांच्या हाती सोपवायचे असे हे राजकारण्यांचे चाळे जनता फार काळ सहन करणार नाही हे राजकारण्यांनी लक्षात ठेवावे.
समस्त नाशिककरांचे अभिनंदन !

बुधवार, १० जून, २००९

फ्क्त ४६ पैसे कर्जमाफी !

लोकमतमधिल खालील बातमी वाचा
शेतकर्‍याला १०००० रुपयाचे कर्ज असताना फक्त ४६ पैसे कर्ज माफी मिळाली ! शासनाचे आभार ! बाकी पैसे कुठे गेलेत हे जनता पुढील निवडणुकी पर्यंत नक्किच विसरणार ! व आपल्यालाच निवडून देणार !

शनिवार, २१ मार्च, २००९

जय हो.

भिवंडी, कल्याण, मालेगाव, सोलापुर आणि आता नविन राबोडी, ठाणे.
कल्याणला एका लहान घटनेवरून दंगल पेटली होती. परवा तशाच एका क्षुल्लक घटने वरुन राबोडी पेटले. एका रिक्षा व मारुती व्हॅनची टक्कर, दंगलीला कारण ठरते, काय हा योगायोग आहे ?
Rediff.com ने दिलेली बातमी वाचा 180 Kerala youth ready to wage LeT's war .
कॉंग्रेसने भारतभर केलेली ही घाण कोण साफ करणार ? राबोडीत दंगल झाल्यावर पोलीस महासंचालक दंगलग्रस्त भागास भेट देऊन एका विशिष्ट समाजातीलच लोकांशी चर्चा करतात याचा अर्थ काय आहे ? (वाचा लोकसत्ता ठाणे वृतांत १९/०३/२००९, प्रस्तुत फोटो वेब आवृत्तीत दिलेला नाही.) दंगल करण्यार्‍यांशिच चर्चा, काय हा खेळ आहे ? महासंचालकांना दुसर्‍या समाजातील लोकांना भेट द्याविशी वाटत नाही कां ? कि त्यांचे हात कोणत्या आदेशाने बांधलेले आहेत ?
मतदार राजा जागा हो, अन्यथा तुझे हात पाय सगळे बांधून तोंडावर बुक्क्यांचा मार बसेल. असले फाजील लाड करणार्‍या पक्षाला येत्या निवडणुकीत हद्दपार करा, आणि या देशाला वाचवा. शपथ आहे तुम्हाला भारत मातेची.
भारत माता तुम्हाला कधिही माफ करणार नाही तुमचा निर्णय चुकला तर किंवा तुम्ही मतदानाला गेला नाही तर.

शनिवार, ७ मार्च, २००९

शासकिय दिरंगाईचा तिव्र शब्दात निषेध.

शासकिय दिरंगाईचा तिव्र शब्दात निषेध.

या दिरंगाईला काय म्हणावे ? या अधिव्याख्यातांना न्याय कधि मिळणार ?

याच ब्लॉगवरील २५ जानेवारीचा पोस्ट वाचा.

http://barakhadi.blogspot.com/2009/01/blog-post_06.html

परत ३ मार्चच्या लोकसत्तेने दिलेली बातमी वाचा.

http://www.loksatta.com/daily/20090303/tvrt.htm

बातमी खाली दिली आहे

तंत्रनिकेतन अधिव्याख्यातांमध्ये तीव्र नाराजीठाणे/प्रतिनिधीशासकीय तसेच अनुदानित तंत्रनिकेतनातील अधिव्याख्यातांना पदोन्नती मिळून वर्ष होत आले तरी थकबाकी देण्यास प्रशासनाला मुहूर्त सापडत नसल्याने अधिव्याख्यातांमध्ये नाराजी पसरली आहे.मुंबई विभागातील आठ अनुदानित तंत्रनिकेतनातील अधिव्याख्यातांना प्रदीर्घ काळ रेंगाळलेली पदोन्नती एप्रिल २००७ च्या आदेशान्वये तंत्रशिक्षण संचालकांनी मान्य केली. मात्र ११ महिने अंमलबजावणी करण्यात आली नाही. १७ मार्च २००८ ला ‘लोकसत्ता’मध्ये ‘टेक्निकल एररमध्ये अडकली वेतनश्रेणी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच वेतन निश्चिती करण्यात आली. त्यानंतर पुन्हा प्रशासनाची लालफित आडवी घालण्यात आली आणि थकबाकी रखडवून ठेवण्यात आली. वर्ष उलटत असताना अधिव्याख्यातांना थकबाकी देण्यात आलेली नाही. वारंवार संघर्ष करून हक्क मिळवायला लागत असलेले हे अधिव्याख्याते आंदोलनाच्या मार्गावर आहेत.

गुरुवार, १२ फेब्रुवारी, २००९

श्री. जितेंद्र आव्हाड यांचे अभिनंदन : Congradulations Mr. Jinendra Avhad.

राष्ट्रवादी पक्षाचे ठाण्याचे तरुण आमदार श्री. जितेंद्र आव्हाड यांचे करावे तितके कौतुक कमीच पडेल. परवा आपला एक राष्ट्रीय सण येत आहे. काही लोकांचा याला राष्ट्रीय सण म्हणण्यास विरोध आहे, कारण ते बुरसटलेल्या विचारांचे लोक सणाचे महत्व जाणतच नाहीत. तर या राष्ट्रीय सणाला होणारा विरोध झुगारुन श्री. जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातच राममारुती रोडला फक्त "व्हॅलेंटाईन डे" साजरा करता यावा म्हणुन एक दुकान थाटल्याचे वर्तमान पत्रात कळले व आनंद व समाधानाने ऊर भरुन आला. म्हणुन हे अभिनंदन !
समस्त तरुण वर्गाच्या भावना समजून घेतल्या बद्दल परत एकदा आभार.
ठाण्यातच नाही तर सर्वत्रच, तरुणांच्या पाठीशी रहाणार्‍या अशा नेत्यांची महाराष्ट्राला नाही तर देशाला गरज आहे.
तरुण वर्गाची होणारी कुचंबणा लक्षात घेवून श्री. आव्हाड यांनी यापुढे तरुणांसाठी खालील सोयी कराव्यात ही विनंती.
१. तरुण वर्गाला आपल्या भावना जोडीदाराला जवळून निट सांगता याव्यात यासाठी "तारांगणाच्या" धर्तीवर "प्रेमांगण" निर्माण करावे. तेथे तरुण वर्ग आपल्या भावना चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकेल व कोणाचाही तेथे अडथळा होणार नाही.
२. सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी आपल्या प्रेमळ भावना व्यक्त करायला परवानगी द्यावी यासाठी प्रयत्न करावे.
३. श्री. आव्हाड यांचा पक्ष सत्तेवर असे पर्यंत त्यांनी कोणत्याही रस्त्यावर व सार्वजनीक ठिकाणी प्रेमळ भावना व्यक्त करतांना दिसल्यास पोलीसांचा त्रास होणार नाही असा आदेश काढावा.
४. प्रत्येक शहरात मुख्य रस्त्यांच्या बाजूला अशी "प्रेमळ ठिकाणे" निर्माण करावी.
५. तरुणींची हल्ली वाहत जाणारी तरुणाई व त्यांचे पोशाख काही बुरसटलेल्या वर्गाला खटकतात. अशा बुरसटलेल्या लोकांवर खटले भरुन त्यांना चांगला धडा शिकवावा. तसेच या तरुणींना अधिक मोकळी हवा मिळेल असे कपडे घालण्यास मिळावेत यासाठी आपण अशा वस्त्रांची निर्मीती करुन विकण्याची व्यवस्था करावी.
अधिक काही सुचल्यास वा कोणी सुचवल्यास यात भर घालेन याचे आश्वासन देतॊ.
परत भेटूच.

सोमवार, २६ जानेवारी, २००९

पद्मश्री !

आज भारत सरकारने पद्मश्री व पद्मविभूषण हे किताब जाहिर केले. यादी बघुन फार आनंद झाला कारण या यादीत ऎश्वर्या राय बच्चन व हेलन खान यांची नावे आहेत. या सोबतच डॉ. अनिल काकोडकर यांना पद्मविभुषण जाहिर झाले आहे.
काय आहे या ऎश्वर्या राय व हेलन खानचे कर्तुत्व ? पडद्यावर नाचले म्हणजे जर असा सन्मान मिळत असेल तर गावो गावी आजची मुले जे चाळे करत आहेत त्यांना का पोलीस पकडतात ?
डॉ. काकोडकरांसारखी नावे सन्मानाच्या यादीत बघितली तर अभिमान वाटतो पण या सोबत ऎश्वर्या राय !
पडद्यावर नाचून पैसे कमवायचे व वाट्टेलते चाळे करायचे व किताब मिळवायचा, वारे देशा तुझी सरकार.
या पेक्षा मला कोणत्याही प्राथमिक शाळेतला शिक्षक चांगला वाटतो. त्याला का नाही असा सन्मान मिळत ? त्याचे कर्तुत्व या नाचणार्‍याहून नक्किच मोठे असते.
मला आजही माझ्या प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांची आठवण येते कारण मला घडवण्यात त्यांचा वाटा आहेच व मला अशा खरेदी केलेल्या किताबापेक्षा मोठ्ठ्या किताबाचे मानकरी वाटतात.
जय भारत.

रविवार, २५ जानेवारी, २००९

१९१ अधिव्याख्यात्यांची बेठबिगारी.

१९१ अधिव्याख्यात्यांची बेठबिगारी हि बातमी आजच्या लोकमतला वाचल्यावर आधिच तळपायाची मस्तकात गेलेली आग जास्तच पेटून उठली. हे महाराष्ट्र राज्य सर्वात आघाडीवर होते पण विलासी राजकारण्यांनी याचा बिहार करून ठेवला आहे. कोणतेही काम करुन घ्यायचे असेल तर आपल्याला चिरिमीरीची व्यवस्था करायला सांगण्यात येते.
याच स्वरुपाची एक बातमी लोकसत्तेला काही महिन्यांपूर्वी वाचलेली आठवते ती तंत्रशिक्षण संचालकांनी २००७ ला दिलेला वेतनवाढीचा आदेश जवळपास वर्षभर धूळ खात पडलेला असल्याची. ती बातमी आल्यावर काही तंत्रनिकेतनात चौकशी केल्यावर कळले की तंत्रशिक्षण संचालनालयातील अधिकारी लाच मिळायची अपेक्षा करित होते ती लाच न मिळाल्यामूळे वेतनवाढीचा प्रस्ताव तसाच पडून होता. लोकसत्तेला बातमी आल्यावर सुमारे वर्षभर न झालेले काम एका दिवसात पूर्ण करण्यात आले.
[ ती मूळ बातमी व या बातमी नंतर काय झाले हे संबंधित महाविद्यालयात परत चौकशी करुन या ब्लॉगवर आपल्याला पुरवली जाईल.]
असे प्रकार थांबवण्यासाठी सर्व वाचकांना विनंती करतो कि भ्रष्टाचाराशी लढण्यात आम्हाला मदत करा.
२३ जानेवारी २००९
वरिल आदेश निघुन आज २२ महिने होत आलेत पण संबंधित अधिव्याख्याते त्यांच्या हक्काच्या थकबाकीची वाट बघत थांबले आहेत. या दरम्यान कोणतीही हालचाल होताना दिसत नाही असे या अधिव्याख्यातांचे म्हणणे आहे. कोणतेही आंदोलन न केल्यामुळे त्यांना ही थकबाकी मिळत नसल्याचे जाणवते.
त्यांची ही थकबाकी या महिन्यात न मिळाल्यास हेच लोक एका अभिनव आंदोलनाच्या तयारित आहेत. संबंधित अधिकार्‍यांचे श्राद्ध घालायच्या तयारीत हि मंडळी आहेत असे कळते. ९ एप्रिल रोजी संबंधित सर्व अधिव्याख्याते ऊपवास करुन आपला निषेधा नोंदवणार आहेत. वर्तमान पत्रांनी हा मुद्दा उचलुन धरावा व या अधिव्याख्यात्यांची थकबाकी मिळवून द्यावी अशी अपेक्षा आहे. अन्यथा माहितीचा अधिकार आहेच व संबंधित अधिकार्‍यांनी या दरम्यानचे व्याज का देऊ नये व त्यांच्या कडून याची वसुली का करण्यात येऊ नये असाही मुद्दा उपस्थीत होतो.
भ्रष्टाराशी लढण्यास तयार असणार्‍यांनी director@dte.org.in या ई-मेल पत्यावर प्रश्न विचारून संचालकांना याचे उत्तर विचारावे. उत्तर मिळे पर्यंत रोज किमान दहा ई-मेल पाठवाव्यात. असेच यापुढे सर्व भ्रष्टाचारी अधिकार्‍याना प्रश्न विचारण्यात येतील याची संबंधितांनी नॊंद घ्यावी.

भ्रष्टाचारा विरुद्ध आपण लढायला तयार होणार का ?

Related Posts with Thumbnails